ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक द्या : अरगडे

ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक द्या : अरगडे

मंचर, ता.१७ : “कुटुंबातील सर्व सदस्यांनी ज्येष्ठांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांना सतत आनंदी ठेवावे. त्यांनी कसलीही चिंता न करता आनंदी जीवन जगावे. त्यामुळे निरोगी आयुष्य जगता येते.” असे उस्मानाबाद सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश देवराम नारायण अरगडे यांनी सांगितले.
चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांचे आई, वडील, पत्नी राधाबाई दत्तू लोंढे, दत्तू नारायण लोंढे (वळती), पंढरीनाथ मारुती थोरात, कौसल्या पंढरीनाथ थोरात (लौकी), किसन तुकाराम बौऱ्हाडे (कानसे), लक्ष्मण विष्णू भागवत (डिंभे), मंगला बांगर (पिंपळगाव खडकी), हुतात्मा बाबू गेणू सैद यांचे पुतणे के. के. सैद (महाळुंगे पडवळ) यांचा शाल, स्मृती चिन्ह, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष दशरथ भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, फेस्कॉमच्या पुणे प्रादेशिक विभाग सहसचिव मंदा हिंगे, विकास पोखरकर, सोपान नवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत इंदोरे गुरुजी यांनी अहवाल वाचन केले.
सरपंच शांता इंदोरे, उपसरपंच गणेश इंदोरे, प्रकाश इंदोरे, नामदेव थोरात, संजय इंदोरे, दादाभाऊ चासकर, सूर्यकांत थोरात, राजेश इंदोरे हे उपस्थित होते. बळवंत इंदोरे गुरुजी व विलास इंदोरे यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम इंदोरे यांनी आभार मानले.
........................
07288

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com