Wed, May 31, 2023

मंचरमध्ये तरुणाकडून
पिस्तूल, काडतुसे जप्त
मंचरमध्ये तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त
Published on : 4 February 2023, 2:00 am
मंचर, ता. ४ : मंचर (ता. आंबेगाव) येथील एसटी बसस्थानकावर वीस हजार ६०० रुपये किमतीचे देशी एक पिस्तूल व सहा काडतुसे बाळा बारकू केदारी (वय ३०, रा. ठाकरवस्ती-पिंपळगाव खडकी ता. आंबेगाव) याच्याकडून जप्त केली. मंचर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजून त्याचे कोणी साथीदार आहेत का? याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली. याबाबत पोलिस जवान योगेश रोडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.