अवसरीत भरधाव टेम्पोची विजेच्या खांबाला धडक

अवसरीत भरधाव टेम्पोची विजेच्या खांबाला धडक

मंचर, ता.५ : मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.५) दुपारी टेम्पोचे स्टेरिंगचा रॉड तुटल्याने भरधाव टेम्पो वीजवाहक खांबाला धडकला. टेम्पोचे व विजेच्या खाबाचे नुकसान झाले. वीज वाहिन्या तुटल्यामुळे अवसरी खुर्द, गावडेवाडी ,अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. सुदैवाने अन्य कोणतीही दुर्घटना घडली नाही.
मंचरहून मेंगडेवाडी गावाकडे संजय देवकाते टेम्पो घेऊन जात होते. अवसरी खुर्दचे वळण ओलांडून पाण्याच्या टाकीसमोर टेम्पो आल्यानंतर देवकाते यांचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. टेम्पो विजेच्या खांबाला धडकला. खांब दोन ठिकाणी तुटला. वीजवाहक वाहिन्या जमिनीवर कोसळल्या. तेथून पंधरा फुटावर चार ते पाच मित्र बोलत उभे होते. त्यांनीही आपला जीव वाचला म्हणून म्हणून परमेश्वराचे आभार मानले.
भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे व काही ग्रामस्थांनी टेंपोमध्ये अडकलेल्या व भयभीत झालेल्या देवकाते यांना धीर देऊन बाहेर काढले.
दरम्यान, महावितरण कंपनीतील जनमित्रांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.
07450

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com