मंचर येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी ''स्वाभिमानी''चा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी ''स्वाभिमानी''चा मोर्चा
मंचर येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी ''स्वाभिमानी''चा मोर्चा

मंचर येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी ''स्वाभिमानी''चा मोर्चा

sakal_logo
By

मंचर, ता.१५: “आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जनजीवन विस्कळित झाले आहे. रात्री पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे झाले आहे. महावितरण कंपनीने कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करावा. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी मंचर (ता.आंबेगाव) येथील प्रांत कार्यालयावर मंगळवारी (ता.२१) सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले.
पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथे बुधवारी(ता.१५) झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत प्रभाकर बांगर बोलत होते. ते म्हणाले “आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे व वाड्यावस्त्यावर बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे.पाळीव प्राणी व मानवावर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माणिकडोह बिबट निवारा केंद्राची क्षमता वाढवावी. तसेच पिंजरे व व वन कर्मचारी संख्या वाढवावी.”