गावडेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावडेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
गावडेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

गावडेवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

मंचर, ता. २० : आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने हिरकणी विद्यालयात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या पोवाड्यांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच स्वरूपा गावडे, उपसरपंच योगिता गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष देवराम गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी हिरकणी विद्यालयाचे उपाध्यक्ष सुनील गावडे, अशोक डोंगरे, शिवाजीराव गावडे, ऋषिकेश गावडे, राजू शिंदे, बाळासाहेब गावडे, ग्रामसेविका दिपाली थोरात व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा साकारली होती. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. ईश्वरी हिंगे या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती देणारा पोवाडा सादर केला. मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी स्वागत केले. ज्योती दहीतुले यांनी आभार मानले.