मंचरकरांकडे साडेपाच कोटींची थकबाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरकरांकडे साडेपाच कोटींची थकबाकी
मंचरकरांकडे साडेपाच कोटींची थकबाकी

मंचरकरांकडे साडेपाच कोटींची थकबाकी

sakal_logo
By

मंचर, ता.२१ : “मंचर (ता.आंबेगाव) नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांकडे घरपट्टी व पाणीपट्टी कराची तब्बल पाच कोटी ८३ लाख रुपयाची थकबाकी आहे. थकबाकी रकमेची वसुली करण्यासाठी तीन पथके कार्यरत केली आहे. थकबाकीची रक्कम न भरणाऱ्या कुटुंबांचा व व्यावसायिकांचे नळ जोड बंद केले जातील,”असा इशारा मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिला आहे.
“मंचर नगरपंचायत मार्फत नोटीस देवूनही नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम भरणा केली नाही. त्यांच्या एकूण थकीत रकमेवर महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ मधील कलम १५० अ अन्वये प्रतिमहिना दोन टक्के व प्रति वर्ष २४ टक्के दंड शास्ती आकारणी केली जाईल. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास जप्तीचे अधीपत्र काढून मालमत्ता कराच्या रकमेची संपूर्ण वसुली होईपर्यंत मालमत्ता ताब्यात घेतली जाईल. नागरिकांनी या सूचनेची गांभीर्याने दाखल घेऊन चालु व थकबाकी रक्कम नगरपंचायत वसुली पथक अथवा या कार्यालयात तत्काळ भरणा करावी व संभाव्य कारवाई टाळावी.” असे जाधव यांनी सांगितले.