मंचर येथील शिवकल्याण पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मंचर येथील शिवकल्याण पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मंचर, ता. २२ : येथील शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आंबेगाव तालुक्याचे सहाय्यक निबंधक पी.एस.रोकडे यांनी काम पहिले.
पतसंस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. पतसंस्थेचे संस्थापक अॅड.अविनाश रहाणे यांच्या नेतृत्वाखाली रंगनाथ विठ्ठल थोरात, उत्तम शिवाजी भेके, सुनील दामोदर बाणखेले, संदीप अर्जुन गुंजाळ, सुरेश दत्तात्रेय चव्हाण, शांताराम भाऊ जाधव, रवींद्र हिरामण सोनवणे, माधवी अविनाश रहाणे, विजया सुहास चव्हाण, संतोष बायजा डोके, विजय सहादू जाधव यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पतसंस्थेकडे नऊ कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने सहा कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सभासदांना १२ टक्के लाभांश वाटप केले आहे. पतसंस्थेला सतत ऑडिट वर्ग `अ’ मिळालेला आहे. पतसंस्थेत अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरु आहे. असे अॅड.अविनाश रहाणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com