मंचरमध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले

मंचरमध्ये कांद्याचे बाजारभाव कोसळले

मंचर, ता. २८ : मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. २८) कांद्याचे बाजारभाव कोसळले. कांदा उत्पादकांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला सरासरी ८० ते ते १०० रुपये प्रती दहा किलोला बाजारभाव मिळाला. कवडीमोल बाजारभावाने कांद्याची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
मंचर बाजार समितीच्या आवारात रविवार, मंगळवार व गुरुवारी कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने शेतकऱ्यांच्या समोर होतात. कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने पुणे, मुंबई भागातील खरेदीदार येथे आले नव्हते. स्थानिक १८ आडत्यांनी कांद्याची खरेदी केली. नारोडी, घोडेगाव, लौकी, पिंपळगाव, निरगुडसर, रांजणी, खडकी, वडगाव काशिंबेग, एकलहरे, कळंब, महाळुंगे पडवळ या भागातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

कांद्याचे विक्री दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला दोन हजार २०० रुपये ते दोन हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. यावर्षी मात्र हे दर फारच खाली आले आहेत. त्यामुळे वाहतूक मजुरी व अन्य खर्च भागवणे कांदा उत्पादकांना अवघड झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना साहाय्य करावे, अशी मागणी किसान सभेने मुख्यमंत्र्यांना खुले पत्र लिहून केली आहे, अशी माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साठवलेल्या कांद्याला धोका होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी आणत आहेत. राज्य सरकारने कांद्याला योग्य बाजारभाव द्यावा.
- स्वरूपा ऋषिकेश गावडे, सरपंच, आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com