मंचरमध्ये आभा हेल्थ कार्ड शिबिरास प्रतिसाद

मंचरमध्ये आभा हेल्थ कार्ड शिबिरास प्रतिसाद

मंचर, ता.१ : मंचर शहरांमध्ये आभा हेल्थ कार्ड व आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ८५० जणांना कार्ड उपलब्ध झाले आहेत. या कार्डमध्ये सर्व आजारांची माहिती समाविष्ट असून संबंधितांना तत्परतेने आरोग्य सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.
मंचर शहराच्या पूर्वेला जुना चांडोली रस्त्यावर वृंदावन सोसायटीपासून मोबाईल नंबर लिंक शिबिरास सोमवारी (ता.२७) सुरवात झाली आहे. खासगी लोक आभा हेल्थ कार्डसाठी पैसे घेतात. संजय थोरात, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात व माजी सरपंच अश्विनी शेटे यांनी याकामी पुढाकार घेऊन नागरिकांना विनामूल्य सुविधा देत आहेत. मंचर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील १७ प्रभागामध्ये हा उपक्रम शुक्रवारपर्यंत (ता.३१) राबविला जाईल. या सुविधांपासून एकही नागरिक वंचित राहू नये, असा प्रयत्न असल्याचे थोरात यांनी सांगितले. अध्यक्ष अरुण लोंढे, स्नेहल चासकर, गणेश खानदेशे, राजू बेंडे पाटील, रंगनाथ थोरात, विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

आभा हेल्थ कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते. या कार्डच्या रुग्णाचा वैद्यकीय इतिहास मिळवता येतो. रक्तगट, आजार इतर सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होते. आभा हेल्थ कार्ड विमा कंपन्यांशी जोडले गेले आहे, असे पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संजय थोरात यांनी सांगितले.

07600

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com