मंचर येथे १४४ टन कचऱ्याची विल्हेवाट

मंचर येथे १४४ टन कचऱ्याची विल्हेवाट

मंचर, ता.१ : मंचर बसस्थानक , शहर व शहरातून जाणाऱ्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. माती, दगड, कचरा व अनावश्यक वस्तू असा एकूण १४४ टन कचऱ्याची विल्हेवाट लावली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त बुधवारी (ता.१) प्रतिष्ठानच्या ५४३ सदस्य, जी.सी.बी व ट्रक्टरच्या सहाय्याने ओला व सुका कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे परिसर स्वच्छ झाला. मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक किरण भालेकर, एस.टी.चे अधिकारी गौरव काळे, संजय थोरात, राजेंद्र थोरात व ग्रामस्थांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
............................
07606

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com