आंबेगावात दहावीच्या परीक्षेसाठी नऊ केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावात दहावीच्या परीक्षेसाठी नऊ केंद्र
आंबेगावात दहावीच्या परीक्षेसाठी नऊ केंद्र

आंबेगावात दहावीच्या परीक्षेसाठी नऊ केंद्र

sakal_logo
By

मंचर, ता. २ : आंबेगाव तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षांना गुरुवारी (ता. २) नऊ केंद्रावर प्रारंभ झाला. तीन हजार ४७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. सर्वाधिक ६१८ विद्यार्थी मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात परीक्षा देत आहेत, अशी माहिती गट शिक्षण अधिकारी सविता माळी यांनी दिली.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील रा. प. सबनिस विद्यालय व अनंतराव कुलकर्णी विद्यालय परीक्षा केंद्र आंबेगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात पूर्वीपासून समाविष्ट आहे. इयत्ता दहावी परीक्षेचा पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडा तणाव होता. पण, परीक्षा दिल्यानंतर बाहेर आल्यावर मात्र विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते. आपण दिलेली उत्तरे बरोबर आहेत किंवा नाही याबाबतची खातर जमा ते मित्र व उपस्थित शिक्षकांकडून करून घेत होते.
विद्यालयाचे नाव व विद्यार्थी संख्या : सबनिस विद्यालय (५७०), भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द (३६०), पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर (४४९), जनता विद्या मंदिर घोडेगाव (४३३), भीमाशंकर विद्यालय शिनोली (२२१), पंढरीनाथ विद्यालय पोखरी(२८९), भैरवनाथ विद्याधाम विद्यालय लोणी (२४१), अनंतराव कुलकर्णी विद्यालय नारायणगाव(२९८).
विस्तार अधिकारी गजानन पुरी, साहेबराव शिंदे, शत्रुघ्न जाधव, कांताराम भोंडवे, प्राचार्य उत्तम आवारी, उपमुख्याध्यापिका सुरेखा भांगरे, यादव चासकर, दिलीप चौधरी व्यवस्था पाहत आहेत.