Tue, May 30, 2023

पेठ परिसरात २२० परीक्षार्थी
पेठ परिसरात २२० परीक्षार्थी
Published on : 2 March 2023, 12:45 pm
मंचर, ता. २ : पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर सातगाव पठार भागातील पाच माध्यमिक विद्यालयातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत केंद्र संचालक प्राचार्य अशोक वळसे पाटील, उपकेंद्र संचालक प्रकाश हांडे व शिक्षकांनी केले.
हरीशचंद्र तोत्रे माध्यमिक विद्यालय (कुरवंडी), सोमनाथ नवले विद्यालय (भावडी), शासकीय निवासी शाळा व श्री वाकेश्वर विद्यालय (पेठ), नवखंड माध्यमिक विद्यालय (पारगाव तर्फे खेड) येथील २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
एस. पी. गायकवाड, अतुल पाटील, वाय. आर. श्यामराव, सुजय जाधव, एच. डी. इंगुळकर, संजय पवळे आदि पथक कार्यरत होते. पर्यवेक्षक शिवाजी आहेर, बाळासाहेब धुमाळ, भानुदास धुमाळ, हेमंत गाडेकर, राकेश वाडेकर अंकुश मांठे यांनी व्यवस्था पहिली.