भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भावात वाढ होत नसल्याने 
कांदा उत्पादक हवालदिल
भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल

भावात वाढ होत नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल

sakal_logo
By

मंचर, ता. २ : मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी (ता. २८) कांद्याच्या बाजारभावात वाढ न झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले होते. विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला प्रती दहा किलोला ८० ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात कधी सुधारणा होणार, या चिंतेत शेतकरी होते.
मंचर बाजार समितीच्या आवारात गुरुवारी १३ हजार कांदा पिशव्यांची आवक झाली. आंबेगाव तालुक्याप्रमाणेच खेड तालुक्यातील वाफगाव, वरुडे, जऊळके, पाबळ, कन्हेरसर व शिरूर तालुक्यातील जांबुत, पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांनी कांदे विक्रीसाठी आणले होते. कांद्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार लिलाव पद्धतीने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु होते. कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने पुणे, मुंबई भागातील व्यापाऱ्यांनी येथे पाठ फिरवली होती. स्थानिक ३८ अडत्यांनी कांद्याची खरेदी केली.