आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील  रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी
आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी

आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील रस्त्यांसाठी वीस कोटींचा निधी

sakal_logo
By

मंचर, ता.९ : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील सात रस्त्यांच्या कामांसाठी वीस कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामे सुरु होतील,” अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
ते म्हणाले मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा क्रमांक दोन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांची मागणी या भागातील ग्रामपंचायती, व परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार कामे मार्गी लागली आहेत.
कामाचे नाव व कंसात मजूर रक्कम : आंबेगाव तालुका : वैदवाडी ते ढाकाळे रस्ता लांबी पाच किलोमीटर (तीन कोटी ६३ लाख रुपये), भावडी - कुरवंडी ते कोळवाडी रस्ता लांबी दोन किलोमीटर (एक कोटी २० लाख रुपये), डिंभे ते कोलतावडे बेंढारवाडी रस्ता लांबी ३.५ किलोमीटर (दोन कोटी ४८ लाख रुपये)
शिरूर तालुका : पाबळ ते गणेशनगर रस्ता लांबी १.३ किलोमीटर (एक कोटी १४ लाख रुपये), कवठे ते धुमाळवाडी पोकळदरा वडगावपीर रस्ता लांबी चार किलोमीटर (तीन कोटी ९५ लाख रुपये), कवठे ते गणेशी लाखणगाव रस्ता लांबी सहा किलोमीटर (चार कोटी ८२ लाख रुपये), मलठण ते शिंगाडेवाडी रस्ता लांबी २.१ किलोमीटर (दोन कोटी सात लाख रुपये).