अडीच लाख रुपयांच्या गायीची सोशल मीडियावर धूम

अडीच लाख रुपयांच्या गायीची सोशल मीडियावर धूम

मंचर, ता.१३ : शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या हौसेला मोल नाही. हे दाखवून देण्याचे काम मंचर (ता.आंबेगाव) येथील दूध उत्पादक शेतकरी गणेश खानदेशे यांनी केले आहे. त्यांनी डेन्मार्क जातीच्या ''सोनू'' गायीची खरेदी तब्बल दोन लाख ५१ हजार रुपयांना केली आहे. गाय पाहण्यासाठी दूरवरच्या भागातील शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. गायीची सध्या सोशल मीडियावर जोरदार धूम सुरू असून नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शेतकरी संजय सालगुडे पाटील यांच्याकडे असलेली गायी प्रतिदिन ४० ते ४२ लिटर दूध देत असल्याची माहिती खानदेशे यांना समजली. तेथे जाऊन गायीची पाहणी केली. इतर शेतकऱ्यांकडे चौकशी करून खात्री पटल्यानंतरच खानदेशे यांनी गाय खरेदी केली.
खानदेशे म्हणाले की, गाईला मका, ज्वारी, नेपियर, गवत, कडधान्याचे भुस, मुरघास, आणि काडीपेंड, शेगदाणा पेंड, भरडा, चुनी, भुसा, मिनरल मिक्चर, सोडा, मीठ, गूळ असा संतुलित आहार दिवसातून दोनदा व वेळेवर पाणी दिले जाते.

गायीचे वय पाच, सहा फूट उंची असून, ती आठ फूट लांबी आहे. काळा बांडा रंग, सडात योग्य अंतर, मागील पायाची बाजू सरळ, दिसायला देखणी अशी सोनूची वैशिष्ट्य आहेत.
- गणेश खानदेशे, दूध उत्पादक शेतकरी.

जातिवंत दुधाळ गायींची पैदास करण्याकरिता वर्ल्ड वाइड ए-बी.एस, डेन्मार्क या जातीचे प्रमाणित वळुंचे सिमेनवर काम करण्याची गरज आहे. वाढलेल्या पशुखाद्यांच्या किमती आणि औष‌धांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे. तसेच राज्यातील दूध उत्पादकांना व्यवसायात येणाऱ्या अडचणी वार्षिक कार्यशाळा प्रकल्प भेटींचे आयोजन करून येऊन सोडविल्या पाहिजेत. त्यासाठी पंजाब राज्याप्रमाणे पशू धोरण महाराष्ट्र शासनाने राबविण्याची आवश्यकता आहे.
- आकाश थोरात,आकाश डेअरी फार्म मंचर .

07700

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com