
निघोटवाडी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निघोट
मंचर, ता.१४ : निघोटवाडी (ता .आंबेगाव) येथील निघोटवाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किसनराव बाबूराव निघोट व उपाध्यक्षपदी दत्तात्रेय जिजाभाऊ निघोट यांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.ए .जरे यांनी काम पहिले पहिले.
संस्थापक मारुती निघोट, डॉ. बाळशिराम निघोट, जालिंदर निघोट, नवनाथ भिवसेन निघोट, गणेश निघोट, मारुती काठे, सुनीता दैने, राजश्री भेके यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच नवनाथ बबन निघोट याच्यासह पतसंस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
पतसंस्थेचे भागभांडवल ४३ लाख ७१ हजार ८०० रुपये असून एक हजार २०० सभासद आहेत. सात कोटी २० लाख रुपये ठेवी आहेत. पाच कोटी २६ लाख रुपये कर्ज वाटप केले असून ३२ लाख ६७ हजार रुपये नफा झाला आहे, अशी माहिती पतसंस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र वाघ यांनी दिली.
......................
07697, 07698