स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थींची मंचर येथे मंगळवारी मुलाखती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थींची 
मंचर येथे मंगळवारी मुलाखती
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थींची मंचर येथे मंगळवारी मुलाखती

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणार्थींची मंचर येथे मंगळवारी मुलाखती

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : ‘राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मंचर (ता. आंबेगाव) येथील टपाल कार्यालयाजवळ आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण सत्र, प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया व मुलाखती मंगळवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता होणार आहे,’ अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सां. ब मोहिते यांनी दिली.

ते म्हणाले ‘‘प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांना एक हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. उमेदवारांना साडेतीन महिने स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान हे प्रशिक्षण पूर्ण वेळ असून, गणित, इंग्रजी, लिपिक योग्यता चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय शिकवले जातात. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या शासकीय निमशासकीय व आस्थापनांमध्ये वर्ग तीन पदासाठी निवड होण्यास या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. १८ ते ३८ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये निवास व भोजनाची उमेदवारांना स्वतः व्यवस्था करावी लागेल. उमेदवारांनी सर्व मूळ शैक्षणिक पात्रतेच्या व सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या दाखल्यासह मुलाखतीसाठी हजर राहावे.’’