विठ्ठल काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल काळे यांना
आदर्श शिक्षक पुरस्कार
विठ्ठल काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विठ्ठल काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भावडी (ता. आंबेगाव) येथील आदर्श तंत्रस्नेही शिक्षक विठ्ठल शंकर काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.


पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, पायजॅम फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

काळे यांनी सर्टीफिकेशन कोर्स फॉर कोडिंग फंडामेंटल (C3F)च्या माध्यमातून विशेष प्राविण्‍य मिळवले आहे. त्यांच्यामुळे शाळेला संगणक प्रयोगशाळेसाठी ८ संगणक मिळाले आहेत. विद्यार्थ्यामध्ये संगणक शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्या डॉ. शोभा खंदारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सविता माळी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सारिका बाजारे यांनीही काळे यांचा सन्मान केला.
..............................................