जिल्ह्यात शेती योजनांसाठी १०० विस्तारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात शेती योजनांसाठी १०० विस्तारक
जिल्ह्यात शेती योजनांसाठी १०० विस्तारक

जिल्ह्यात शेती योजनांसाठी १०० विस्तारक

sakal_logo
By

मंचर, ता.२६ :" केंद्र व राज्य सरकारच्या अनेक नावीन्यपूर्ण व लोककल्याणकारी योजना आहेत. त्यांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात चार हजार किसान मोर्चा विस्तारक नेमले जाणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०० विस्तारकांचा समावेश असणार आहे. विस्तारक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संपर्क साधणार आहेत.” अशी माहिती पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी दिली.
मंचर (ता.आंबेगाव) येथे भाजप पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत संजय थोरात बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे संघटक सरचिटणीस माऊली शेळके, ज्येष्ठ नेते रवींद्र त्रिवेदी, जिल्हा सरचिटणीस नवनाथ थोरात, अंकुश गवळी, संतोष शेलार उपस्थित होते. शरद चौधरी, नानासाहेब गवळी, दत्तात्रेय मळेकर, प्रकाश देसाई, रामदास रोडे, विठ्ठल कोह्राळे, योगेश गवळी, संदीप जाधव यांनी चर्चेत भाग घेतला.

आंबेगाव तालुक्यात भाजप किसान मोर्चातर्फे पंतप्रधान पीक विमा योजना राबविणार आहे. याबाबत काही शंका व अडचण असल्यास शेतकऱ्यांनी मंचर येथील भाजप किसान मोर्चा जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क करावा, असे नवनाथ थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, माऊली शेळके म्हणाले, “विस्तारक नेमण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल.”


विस्तारकांमार्फत नमो महा सन्मान किसान निधी योजना, एक रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान, आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल अनुदान, महा डिबीटीद्वारे मागेल त्याला शेततळे, अस्तरिकरण, शेडनेट, हरितग्रह, शेतीसाठी यांत्रिक औजारे अनुदान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी एक हजार ८०० रुपये रुपये अनुदान आदी लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.
- संजय थोरात, जिल्हाध्यक्ष भाजप किसान मोर्चा, पुणे.

07773