पेठ सोसायटीवर सहकार पॅनेलची सत्ता

पेठ सोसायटीवर सहकार पॅनेलची सत्ता

मंचर, ता. २५ : पेठ (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत (सन २०२३-२८) श्री वाकेश्वर सहकार पॅनेलच्या सर्व १३ उमेदवारांनी दणदणीत विजय संपादित केला असून, श्री वाकेश्वर परिवर्तन पॅनेलचा पराभव झाला.
पेठ सोसायटीने शताब्दी वर्ष पार केले आहे. येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सरपंच राम तोडकर व वाकेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ यांनी प्रयत्न केले. पण, यश आले नाही. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. निवडणुकीमध्ये चुरसही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. पण, विरोधी पॅनेलला येथे यश मिळाले नाही.
श्री वाकेश्वर सहकार पॅनेलचे नेतृत्व शरद बँकेचे संचालक संतोष धुमाळ, उपसरपंच मयूर काळे, ज्ञानेश्वर वाकचौरे, रामराव शिंदे, प्रमोद धुमाळ, नंदकुमार ढमाले, जगदीश धुमाळ यांनी व श्री वाकेश्वर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व दिलीप पवळे, संभाजीराव काळे, मनोहर कंधारे, धर्मराज माठे यांनी केले.
श्री वाकेश्वर सहकार पॅनेल विजयी उमेदवार : सुदाम महादेव काळे, आदिनाथ बबन ढमाले, राहुल शिवाजी शिंदे, जितेंद्र अशोक धुमाळ, शरद तुकाराम वाकचौरे, मुरलीधर विठोबा धुमाळ, भरत चिमाजी थोरात, सुखदेव शिवराम बुट्टे, साधना भानुदास धुमाळ, मंगल संतोष शिंदे, जयराम महादू ढमाले, संजय नामदेव ओव्हाळ,बबन श्रीपती बोऱ्हाडे (बिनविरोध).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com