
मंचर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू
मंचर, ता. २७ : मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळाचा (२०२२/२०२३ ते २०२७/२०२८) १८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे सहायक निबंध (सहकार) तथा निवडणूक निर्णयअधिकारी पी. एस. रोकडे यांनी दिली.
सोमवारपासून (ता. २७) अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे मतदान २८ एप्रिल रोजी होणार असून २९ एप्रिल रोजी निकाल लागणार आहे.” असे रोकडे यांनी सांगितले.
सोमवार (ता.२ ७) ते सोमवार (ता. ३ एप्रिल) रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. बुधवारी (ता. ५) अर्ज छाननी व गुरुवारी (ता. ६) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ६) ते गुरुवारी (ता. २०) पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. शुक्रवारी (ता. २१) अंतिम उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शनिवार (ता. २९) मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण मतदार संख्या १ हजार ८०९ आहे.
गटाचे नाव व जागा
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ११, सर्वसाधारण गट ७, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय १, अनुसूचित जमाती एक, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, सर्वसाधारण २, अनुसूचित जाती-जमाती १, आर्थिकदृष्ट्या दुर्बल १, व्यापारी-अडते २, हमाल-मापाडी १.