
शिनो ली भीषण अपघात जोड.
शिनोली येथे झालेल्या अपघातास जागीच ठार झालेला ओमकार सुमंत याने भरधाव मोटरसायकल चालवून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, असे घोडेगाव पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. ते म्हणाले विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप चालकाने अपघात होऊ नये म्हणून काळजी घेतली होती. पिकअपला ओव्हरटेक करत असताना मोटरसायकलचा वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे पिकअप गाडीला धक्का बसून डांबरी रस्त्यावर ओमकार सुमंत यांचे डोके आपटले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यात हेल्मेट असते तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती. अपघात पाहणाऱ्या अनेक साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. अपघाताची माहिती पोलिसांना पिकअप गाडी चालकांनी दिली. त्यानेही अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मोटर्स सायकल चालक विद्यार्थी सुमन याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गॅदरिंगचा कार्यक्रम रद्द
ओमकार सुमंत व त्याचे दोन मित्र हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. या दुर्घटनेमुळे महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आज (ता.३०) रात्री होणारा गॅदरिंगचा कार्यक्रम रद्द केला आहे, अशी माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी दिली.