मंचर येथे यात्रेनिमित्त उद्या कुस्त्यांचा आखाडा

मंचर येथे यात्रेनिमित्त उद्या कुस्त्यांचा आखाडा

मंचर, ता.१२ : मंचर (ता.आंबेगाव) येथे श्री कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त गुरुवारी (ता.१३) धार्मिक कार्यक्रम व शुक्रवारी(ता. १४) कुस्त्यांचा आखाडा आयोजित केला आहे. यात्रेनिमित्त शहरात अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई व स्वागत कमानी उभारल्या आहेत.
यात्रेनिमित्त गुरुवारी सकाळी सात वाजता मांडव डहाळे, सकाळी नऊ वाजता भैरवनाथ महाराज यांना मानाचा हार अर्पण केला जाणार आहे. सदर हाराचा बोलीद्वारे लिलाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे. हाराचा लिलाव घेणाऱ्या भाविकाला सवाद्य मिरवणुकीने भैरवनाथ मंदिरात नेण्याची परंपरा आहे. त्यामुळे लिलावाच्या बोलीत अनेक दानशूर भाविक सहभागी होतात. सकाळी ११ वाजता शाहीर रामदास गुंड तुरेवाले व शाहीर ठकसेन शिंदे यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.
संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पालखीची मिरवणूक होणार आहे तर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात कुस्त्यांचा आखाडा भरणार आहे, अशी माहिती मंचर, निघोटवाडी व शेवाळवाडी यात्रा समितीने पत्रकाद्वारे दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com