अवसरीत पाणी पुरवठा विस्कळित

अवसरीत पाणी पुरवठा विस्कळित

मंचर, ता. २४ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावाजवळून हुतात्मा बाबू गेनू जलाशयाचा (डिंभे धरण) उजवा कालवा वाहत आहे. विहिरीला पाणीही पुरेशा प्रमाणात आहे. अशा अवस्थेत गावकऱ्यांना दिवसाआड पाणी पुरवठा मिळत असल्याने महिलांचे हाल सुरु आहे.
अवसरी खुर्द गावामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. अनेक विद्यार्थी येथे राहतात. तसेच, गावाची लोकसंख्या पाच हजारहून अधिक आहे. नळ पाणीपुरवठा योजनेसाठी गेली वीस वर्षात अडीच ते तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला आहे. गावापासून दोन किलोमीटर अंतरावरून पाझर तलावातून लोखंडी पाईपद्वारे पाणी गावात आणले. त्यानंतर गावठाण व वाड्यावर पाणी सोडले जाते. ३५ ते ४० वर्षापूर्वी नळ पाणीपुरवठा गावठाण करिता राबवण्यात आली. त्यानंतर मागणीनुसार खालचा शिंदेमळा, खडकगाव, मधला टेमकरमळा, बेघरवस्ती, नवरेवस्ती करिता नळ पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. गावाला एकाच टाकीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन, पाइपलाइन गळती, विद्युत मोटर जळणे, अशा समस्या येऊ लागल्या. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले नाही. पाण्याची वाट पाहत महिलांना बसावे लागते. त्यामुळे शेतात व अन्य ठिकाणी मजुरीला जाणाऱ्या महिलांचा अनेकदा रोजगारही बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी (ता. २२) रमझान ईद व अक्षय्य तृतीया सणाच्या दिवशी ग्रामपंचायतीने संध्याकाळी पाचनंतर पाणी सोडल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. किमान दररोज वेळेत पाणी सोडण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाझर तलावात भरपूर पाणी आहे. परंतु, विहिरीवरील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकी भरण्यासाठी वेळ लागतो. येत्या दोन दिवसापासून नियमित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पाणी सोडले जाईल.
- कमलेश शिंदे, सरपंच, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com