मंचर येथे माजी विद्यार्थी सहविचार मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे माजी विद्यार्थी सहविचार मेळाव्याचे आयोजन
मंचर येथे माजी विद्यार्थी सहविचार मेळाव्याचे आयोजन

मंचर येथे माजी विद्यार्थी सहविचार मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

मंचर, ता. २८ : येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘माजी विद्यार्थी सहविचार मेळावा’ सोमवारी (ता. १) मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्याला “कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.” असे आवाहन अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जी कानडे यांनी केले आहे.
या महाविद्यालयाची स्थापना १९६५ मध्ये झाली. आयुष्यातील मौल्यवान क्षण घालविले त्या महाविद्यालयात पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रांसह पुन्हा भेटण्याची संधी अण्णासाहेब आवटे माजी विद्यार्थी संघ व महाविद्यालय उपलब्ध करून देत आहे.”असे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुरेश भोर यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी https://sites.google.com/view/kalyani789/home या संकेतस्थळावर किंव (९५२४८९८८५०) या व्हाट्सअप क्रमांकावर नावनोंदणी करावी.” असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा.कैलास एरंडे यांनी केले आहे.