मांडूळ जातीच्या सापाला एकलहरे येथे जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडूळ जातीच्या सापाला
एकलहरे येथे जीवदान
मांडूळ जातीच्या सापाला एकलहरे येथे जीवदान

मांडूळ जातीच्या सापाला एकलहरे येथे जीवदान

sakal_logo
By

मंचर, ता. ३ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथे पांजरपोळ वस्तीसमोरील सेवा रस्त्याजवळ इनोसेन्ट ह्यूमन ग्रुपचे अय्युब शेख व अनवर मुल्ला यांनी अंदाजे ४ किलो वजनाच्या मांडूळ सापाला जीवदान दिले.
पांजरपोळ वस्तीसमोर पुणे-नाशिक महामार्गावरून सेवा रस्त्यावर मांडूळ जातीचा साप सरपटत जात होता. त्याच्यावरून गाडी जाण्याचा धोका होता. त्यावेळी अय्युब शेख व अन्वर मुल्ला यांनी त्यास छोट्या गवत काडीच्या साहाय्याने व जमिनीवर पाय वाजवत मुख्य रस्त्यावर न येऊ देता विरुद्ध दिशेच्या शेतात जाण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यास जीवदान मिळाले. माणुसकी जपत मुक्याप्राण्याचा जीव वाचविल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांनी त्यांचे कौतुक केले.