मंचरलमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

मंचरलमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

मंचर, ता. ९ : मंचर (ता. आंबेगाव) शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबेनात. रविवारी (ता. ७) रात्री द पेरीटाइज सोसायटीतील शशिकांत भालेराव यांच्या मालकीची युनिकॉर्न कंपनीची (एमएच १४ डी. एस ३२७६) मोटारसायकल चोरीला गेली आहे. दर आठवड्याला मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी (ता. ७) सकाळी भालेराव कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना मोटारसायकल जागेवर दिसली नाही. भालेराव यांनी मोटारसायकलचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. सदर मोटारसायकल कोठे आढळून आल्यास मंचर पोलिस ठाणे दूरध्वनी क्रमांक ( ०२१३३) २२३ १५९ किंवा मोटारसायकल मालक शशिकांत भालेराव यांच्या मोबाईल क्रमांक ९५०३३०८०४३ येथे संपर्क साधावा.
दरम्यान मंचर शहर व परिसरातून मोटारसायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसात सोसायटीतून सोमनाथ बिडकर यांची (एम.एच १४ जी.के २३८४) व इतर एक अशा दोन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. मंचर पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
“मंचर (ता. आंबेगाव) येथील द पेरीटाइज सोसायटीच्या मागील बाजूस ताडीचे दुकान आहे. येथे अनेक व्यसनी लोकांची वर्दळ असते. सोसायटी परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. या भागात मोटरसायकल चोरी करणारी टोळी कार्यरत आहे. मंचर पोलिसांनी टोळीचा छडा लावावा अशी मागणी.” स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com