माझ्या यशामध्ये कल्पना यांचे मोठे योगदान ः आढळराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माझ्या यशामध्ये कल्पना यांचे 
मोठे योगदान ः आढळराव पाटील
माझ्या यशामध्ये कल्पना यांचे मोठे योगदान ः आढळराव पाटील

माझ्या यशामध्ये कल्पना यांचे मोठे योगदान ः आढळराव पाटील

sakal_logo
By

मंचर, ता. १४ :“मी प्रथमच लोकसभा निवडणूक २००४ मध्ये लढविली होती. निवडणूक निकालही (ता. १४) मे रोजीच जाहीर होऊन विजयी झालो. माझी धर्मपत्नी कल्पना आढळराव पाटील यांचा वाढदिवस (ता. १४) मे रोजी असतो. माझ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत व यशामध्ये कल्पना यांचे फार मोठे योगदान आहे.” असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत एकलहरे ग्रामपंचायतीच्या सदस्या रीना संतोष डोके यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त कल्पना आढळराव पाटील यांचा सन्मान बुके देऊन करण्यात आला. यावेळी आढळराव पाटील बोलत होते.
याप्रसंगी उद्योजक अशोक बाजारे, माजी सरपंच संतोष डोके, अरुण गिरे, रवींद्र करंजखेले, वसंतराव एरंडे, गणेश बाजारे, महेंद्र एरंडे, प्रशांत कातळे उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, “उद्योग व्यवसाय व त्यानंतर संसद सदस्य झाल्यापासून आजतागायत कुटुंब, नातेवाईक व कामानिमित्त ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेण्याचे काम आनंदाने कल्पना करतात. त्यामुळेच मी जनतेसाठी वेळ देऊ शकतो. चिरंजीव अक्षय व अपूर्व यांच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पडली आहे. त्या आदर्श माता व पत्नी या दोन्ही भूमिका उत्तमरीत्या पार पाडत आहेत.”

८०९८