नालंदा इंग्लिशमधील सिद्धांत पवार प्रथम

नालंदा इंग्लिशमधील सिद्धांत पवार प्रथम

मंचर, ता. १३ : मणिपूर-मंचर (ता.आंबेगाव) येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (NCRD) संस्थेच्या नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलमधील सीबीएससी मंडळ इयत्ता दहावी परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे. ७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३४ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्याहून अधिक गुण व बारा विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण मिळाले आहेत.” अशी माहिती स्कूलच्या प्राचार्या करुणा मनुजा यांनी दिली.
सिद्धांत क्रांतिवीर पवार-९८.२० टक्के, प्रथमेश मंगेश हिंगे-९६.४० टक्के, वेदांत क्रांतिवीर पवार यास-९६ टक्के , दिलेशा मनोज निघोट - ९५.२० टक्के, ईशान धीरज समदडीया -९५.०० टक्के गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उपप्राचार्या सोजी जेकब, विद्यालयाच्या संचालिका नेत्रा शहा, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा पूर्वा वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

08100

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com