मंचरला महिलेच्या बॅगेमधून दीड लाखाचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरला महिलेच्या बॅगेमधून दीड लाखाचे दागिने लंपास
मंचरला महिलेच्या बॅगेमधून दीड लाखाचे दागिने लंपास

मंचरला महिलेच्या बॅगेमधून दीड लाखाचे दागिने लंपास

sakal_logo
By

मंचर, ता.१४ : मंचर बस स्थानकावरून एसटी बसमधून घाटकोपर (मुंबई) येथे निघालेल्या महिलेच्या बॅगेतील एक लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शनिवारी (ता.१३) सकाळी घडली आहे.
याबाबत ललिता महादेव गावडे (रा. घाटकोपर मुंबई सध्या रा.गावडेवाडी ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गावडे या शनिवारी घाटकोपर येथे जाण्यासाठी मंचर बस स्थानकावर आल्या होत्या. त्या घाटकोपर एसटी बसमध्ये जाण्यासाठी बसल्या. एस. टी. गाडी चालू झाल्यानंतर पाच मिनिटांनी त्यांना बॅगमध्ये ठेवलेले एक लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने नसल्याचे लक्षात आले.
त्यावेळी त्यांनी बस चालकास सांगत गाडी थांबवून दागिने चोरीला गेल्याची माहिती दिली. याबाबत गावडे यांनी त्यांचे भाऊ यांना बोलवून घेतले. मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र हिले करत आहेत.