Wed, October 4, 2023

चांडोलीत दुकानातून
शटर उचकटून चोरी
चांडोलीत दुकानातून शटर उचकटून चोरी
Published on : 19 May 2023, 9:38 am
मंचर, ता. १९ : चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील ‘नाथ ट्रेडर्स सुपर शॉपी’ या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. १८) रात्री घडली.
याबाबत दुकानाचे मालक नवनाथ रंगनाथ बांगर यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ते नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानासमोर आले असता दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. दुकानातील विविध कंपनीचे तेल डबे, तूप डबे, कॅडबरी, ड्रायफूड विविध कंपनीचे बूट, चपला, असे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.