
जुन्या वस्तू नगरपंचायतीत जमा करा : मुख्याधिकारी
मंचर, ता.२७ : मंचर नगरपंचायतीच्या वतीने ‘मंचर शहर, स्वच्छ व सुंदर’ होण्यासाठी आर.आर.आर (रिड्यूस, रियुज,रिसायकल) सेंटर सुरू केले आहे. या उपक्रमाचा फायदा गरजूंना व गोरगरिबांना होणार आहे. जुन्या वस्तू , जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुनी कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक वस्तू या सेंटरमध्ये जमा करून नगरपंचायतीला नागरिकांनी सहकार्य करावे.” असे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी केले आहे.
मंचर (ता.आंबेगाव) येथे केंद्र सरकारच्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानांतर्गत आर.आर.आर.सेंटर शुभारंभ प्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी स्नेहा निसाळ, स्वप्नील जावळे, नागनाथ बिराजदार, तुषार गांजाळे उपस्थित होते. जाधव म्हणाले “आपल्या घरातील निरुपयोगी वस्तू, जुनी पुस्तके, भांडी, खेळणी फेकण्यापेक्षा सेंटरमध्ये जमा करा, त्यामुळे गरजू व्यक्तीला मदत होईल त्या वस्तूंचा पुनर्वापर होईल मंचर नगरपंचायत कार्यालयीन वेळेत वस्तू जमा कराव्यात. याकामी सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी.
.............
08151