आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

मंचर, ता. २९ : आंबेगाव तालुक्यात मंचर, अवसरी खुर्द, पिंपळगाव, गावडेवाडी, तांबडे मळा, शेवाळवाडी व सातगाव पठार परिसरातील काही गावात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे लग्न सोहळ्यातील वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली.
मंचर शहरात दररोज सायंकाळी बाजार भरतो. त्यामुळे दूरवरच्या भागातील व्यावसायिक मोठ्या संख्येने गृह उपयोगी वस्तू, भाजीपाला, फळे, तरकारी विक्रीसाठी घेऊन आले होते. पावसामुळे त्यांची धावपळ उडाली.
मंचर बसस्थानक, बाजार समिती परिसरात रस्त्याने पाणी वाहत होते. शेतात कांदा साठवलेल्या शेतकऱ्यांची धावपळ झाली.
दरम्यान, पावसामुळे मंचर शहर व परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. तो रात्री आठ वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता. वीजेअभावी पिठाच्या गिरण्या बंद पडल्याने अनेक कुटुंब विजेच्या प्रतीक्षेत होती. सर्वसाधारण कुटुंबांना मेणबत्ती व कंदिलाचा आधार घ्यावा लागला.
वीज पुरवठा कधी सुरू होईल, याबाबतची माहिती महावितरण कडून उपलब्ध होत नव्हती, अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जे.के थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले ‘‘आता पावसाळा सुरू झाला आहे, या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरू करण्यासाठी विशेष दुरुस्ती पथकाची नियुक्ती करावी. त्यामुळे खंडित झालेला वीज पुरवठा लवकर सुरू करणे शक्य होईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com