‘मंचर प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा’

‘मंचर प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा’

मंचर, ता. ३ : येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार करणारा आरोपी जावेद मुख्तार शेख याच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पण, या मुलीवर अमानुषपणे संगनमताने छळ व अत्याचार करणाऱ्या शेख कुटुंबातील संबंधित सर्व गुन्हेगार सदस्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपच्या कायदा आघाडीच्या जिल्हा सचिव ॲड. स्वप्ना खामकर-पिंगळे यांनी खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन पाटील यांच्याकडे केली.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना खामकर-पिंगळे म्हणाल्या की, मंचरमधील सदर अल्पवयीन मुलीला २२ मार्च २०१९ रोजी तिचा दहावीचा शेवटचा पेपर झाल्यानंतर जावेद शेख याने पळवून नेले. या प्रकरणात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, बजरंग दलाचे कार्यकर्ते व मी स्वतः सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मंचर पोलिसांनी जावेद शेख याच्यावर अधिक कलमे लावली आहेत. आरोपी जावेद शेख याच्याप्रमाणेच त्याचे आई, वडील, बहिणी, मावशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मुख्य मागणी आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेउन सदर मुलीचा जबाब व वैद्यकीय तपास अहवालाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यास बाल लैंगिक अत्याचाराचीही कलमे लावण्यात आली आहेत. न्यायालयात अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी पुढील तपास खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील करत आहेत.
- अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक

जावेद शेख याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. सदर अल्पवयीन मुलीचा विस्तारित जबाब घेण्याचे काम केले आहे. जबाबानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.
- डॉ. सुदर्शन पाटील, तपासी अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, राजगुरुनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com