अवसरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

अवसरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

मंचर, ता. ४ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अभंगमळा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठका बापू बरकडे या मेंढपाळाची घोडी ठार झाली आहे. सदर घटना रविवारी (ता. ४) मध्यरात्री घडली. बिबट्याचा वावर व दहशत वाढल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी सोमनाथ रामचंद्र अभंग यांच्या शेतात बरकड यांचा मेंढ्यांचा कळप मुक्कामी होता. शनिवारी रात्री जोरात कुत्री भुंकण्याचा आवाज आला त्यामुळे बरकडे कुटुंबातील सदस्यांना जग आली. तोपर्यंत बिबट्याने बारा महिने वयाच्या घोडीवर हल्ला केला होता. ती मृत्युमुखी पडली होती. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने तेथून पळ काढला. २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक सी. एस. शिवशरण, रेस्क्यू टीमचे सदस्य मनोज तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. माजी सरपंच जगदीश अभंग व स्थानिक नागरिकांनी या भागात पिंजरा लावण्याची व रात्रीची गस्त सुरु करण्याची मागणी वनखात्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com