मंचरच्या बदनामीचा डाव हाणून पाडा : ॲड. रहाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचरच्या बदनामीचा डाव 
हाणून पाडा : ॲड. रहाणे
मंचरच्या बदनामीचा डाव हाणून पाडा : ॲड. रहाणे

मंचरच्या बदनामीचा डाव हाणून पाडा : ॲड. रहाणे

sakal_logo
By

मंचर, ता. ५ : काही धार्मिक घटनांचा आधार घेऊन मंचर (ता. आंबेगाव) शहराचा सुरू असलेल्या बदनामीचा डाव मंचरकरांनी हाणून पाडावा, यासाठी प्रशासनाने मंचर शहरातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांची एकत्र बैठक आयोजित करावी. कथित लव्ह जिहाद प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख ॲड. अविनाश रहाणे यांनी केली.
याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना सोमवारी (ता. ५) निवेदन दिले. त्यात त्यांनी नमूद केले की, या घटनेचा वापर राजकारणासाठी कोणीही करू नये. गेल्या १५ दिवसांपूर्वी एका परप्रांतीय गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याचा आधार घेऊन मंचर शहराची देशात फार मोठी बदनामी केली जात आहे. हा एक कटाचा भाग असून, गेली अनेक दशके मंचर शहरात असलेले सामाजिक सौदाहराचे वातावरण बिघडवून धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्ती करत आहेत. परप्रांतातून आलेल्या काही दुष्ट प्रवृत्ती या शहराचे ऐक्य बिघडवू पाहत आहेत. ज्यांना राजकारण करायचे, त्याने सामाजिक विकासाचे काम करून प्रामाणिकपणे शहराचा विकास करावा. मात्र, मंचरमध्ये येऊन शहराचे सामाजिक ऐक्य, कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम केले; तर मंचरकर त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाहीत.

एसआयटी चौकशीची मागणी
विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रकाशात आणलेले कथित धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रकरण म्हणजे परप्रांतीय गुन्हेगाराने केलेला हा भयंकर द्रोह आहे. पोलिसांनी आरोपीला अटक जरी केली असली, तरी मंचर परिसरात बेकायदा वास्तव्य करून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांचा प्रशासनाने बीमोड करावा. तसेच, या गुन्हेगारी प्रवृत्ती मागे उभी असणाऱ्या शक्तीचा मुळासकट नायनाट होण्यासाठी पडळकरकथित लव्ह जिहाद प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.