स्वयंभू मोरया गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंभू मोरया गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
स्वयंभू मोरया गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

स्वयंभू मोरया गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

sakal_logo
By

मंचर, ता. ७ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता.७) संकष्टी चतुर्थीनिमित्त पेशवेकालीन पुरातन अर्धपीठ गणपती तीर्थक्षेत्र असलेल्या स्वयंभू मोरया गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंचर, राजगुरुनगर, घोडेगाव, भीमाशंकर या भागातील भाविक दर्शनासाठी आले होते. नवविवाहित दांपत्याची संख्या लक्षणीय होती.
पहाटे देवस्थानचे मुख्य पुजारी राजेंद्रकुमार तिवारी यांच्या हस्ते महापूजा, श्रींचा अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांचा दर्शनासाठी ओघ वाढला. संध्याकाळी पाच नंतर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून येथे हार, नारळ, दुर्वा, पेढे यांची दुकाने थाटण्यात आली होती. ट्रस्टच्या वतीने भाविकांची पिण्याच्या पाण्याची व मुख्य आरती नंतर अन्न प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. उद्योजक नरेंद्र घुले व श्री स्वयंभू मोरया देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यानी व्यवस्था पाहिली.

08234