मंचरजवळ भाविकांच्या बसला अपघात
मंचर, ता. १२ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळील तांबडे मळा, नंदी चौक येथे श्रीक्षेत्र शेगाव येथे दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसला समोरच्या ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात २२ भाविक जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास झाला. सर्व भाविक नागपूर येथील आहेत. जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बहुतेकांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नंदी चौकातील गतिरोधकामुळे समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागून येणारी बस जोरात धडकली. धडकेचा जोर एवढा होता की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून पुढील आसनांवरील भाविकांसह चालक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक स्वप्नील मोरे यांच्यासह चार रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, पोलिस उपनिरीक्षक सुनेल धनवे, पोलिस नाईक तानाजी हगवणे, अविनाश दळवी, संपतराव.कायगुडे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विवेकानंद फसाले, डॉ. अश्विनी घोडे यांच्या पथकाने तातडीची मदत सुरू केली.
जखमींची नावे
रमेश रेवतकर (वय ६५), मंजुळाबाई घाटे (वय ६९), कमल खापेकर (वय ७०), कमळ बोंद्रे (वय ६०), छाया काचमोरे (वय ५५), कलावती कोंडे (वय ६९), शर्वरी काकडे (वय १२), अशोक हपुवळे (वय ५२), शोभा शिंदे (वय ५२), नंदा दाते (वय ५५), शोभा कळंबे (वय ५५), सुनीता चिटणीस (वय ६५), सुनंदा शेवाळे (वय ८०), सुशीला बोंद्रे (वय ६५), प्रकाश साविवारे (वय ५७), प्रभू शिंगाटे (वय ६०), विठोबा पांढरे (वय ६९), मालती पवनकर (वय ६२), अमृता दडमले (वय २७), विभा निर्मल (वय ४५), इंदूबाई सुसकरे (वय ७९), छबू साकोटे (वय ५०), सुरेश चौधरी (वय ६२), रत्नमालन दाते (वय ६१), निर्मला चौधरी (वय ५८), सौरभ पीठने (वय २०), शेषराव कुरकुंडे (वय ७२), आदित्य वाणी (वय २०), सोनल राऊत (वय ३१), मोरेश्वर ठाकरे (वय ६५).
4543
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

