जेसीबी पळविणारे चोरटे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेसीबी पळविणारे चोरटे जेरबंद
जेसीबी पळविणारे चोरटे जेरबंद

जेसीबी पळविणारे चोरटे जेरबंद

sakal_logo
By

माळेगाव, ता. ३०ः बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करीत शिर्सुफळ येथून जेसीबी मशिन पळवून नेणाऱ्या दोन्ही चोरांना जेरबंद केले. शिवाय चोरीला गेलेली जेसीबी मशिनही जप्त केली.
सौरभ धनाजी चव्हाण (वय २२, रा. कुरवली ता. इंदापूर), संतोष नामदेव घाडगे (वय ३३, रा. धांगवडी ता. भोर जि. पुणे) हे अटक केलेल्यांची नावे आहे. दरम्यान, गणेश कल्याण जाधव (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि.पुणे) यांच्या मालकीचे जेसीबी मशिन २१ डिसेंबर २०२२ रोजी शिर्सुफळ येथून चोरीला गेले होते. त्यानुसार त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी रविवारपर्यंत (ता. १ मे) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक लंगुटे, पोलिस नाईक सुधीर काळे, तपास पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे, पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत व पोलिस नाईक अमोल नरूटे, रणजित मुळीक या कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00650 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top