माळेगावातील एकोपा अभिमानास्पद ः शर्मिला पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावातील एकोपा अभिमानास्पद ः शर्मिला पवार
माळेगावातील एकोपा अभिमानास्पद ः शर्मिला पवार

माळेगावातील एकोपा अभिमानास्पद ः शर्मिला पवार

sakal_logo
By

माळेगाव, ता. ५ः माळेगावकरांनी हिंदू-मुस्लिम एकोपा ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळेच माळेगावातील इफ्तार पार्टीला बहुतांशी लोक एकत्र आल्याचे आशादायक चित्र आहे, असे मत शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी शर्मिला पवार बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दीपक तावरे, दत्तात्रेय येळे, रणजित तावरे, अमर तावरे, अॅड. राहुल तावरे, शिवराज जाधवराव, जयदीप तावरे, वसंत बाबूराव तावरे, प्रदिप तावरे, संजय भोसले, भगवान गोंडे आदी उपस्थित होते. पोलिस निरिक्षक महेश ढवाण म्हणाले, जातीय सलोखा आणि गावची प्रगती हे चित्र एकमेकांशी संलग्न आहे.’’  तत्पूर्वी मौलाना अब्दुससलाम मुन्नवर खान यांनी उपस्थितांना समानतेविषयी मार्गदर्शन केले. माळेगावचे अॅड. हरुण सय्यद यांनी नुकताच एका अपघातग्रस्त मदत करून त्याचा जीव वाचविल्याबद्दल सन्मान करण्यात आला. अॅड. राहूल तावरे यांनी प्रास्ताविक केले. आभार धनवान वदक यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00653 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top