बोगस सोने खरेदी प्रकरणात १० जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस सोने खरेदी प्रकरणात १० जणांवर गुन्हा
बोगस सोने खरेदी प्रकरणात १० जणांवर गुन्हा

बोगस सोने खरेदी प्रकरणात १० जणांवर गुन्हा

sakal_logo
By

माळेगाव, ता. ५ः  बारामतीच्या पेन्सिल चौकातील चंदुकाका सराफ व पुण्याच्या लिक्विलोन फायनान्स कंपनीला बॅंक अकाउंटच्या खोट्या स्टेटमेंटसह विविध कागदपत्रांच्या आधारे ४५ लाख रुपयांना फसविल्याची माहिती पुढे आली आहे. ९ एप्रिल ते ११ एप्रिल २०२२ दरम्यानच्या कालावधीत वरील घटना घडली.

याप्रकरणी लिक्विलोन फायनान्स कंपनीचे अनुराग महेंद्र अरोरा (वय ३१, रा. हडपसर) यांनी १० संशयित आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंदापूर, माळशिरस तालुक्यासह बारामतीमधील ११ जणांविरुद्ध फसवणूकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये अभिजित रामनाथ शेळके (रा. बेलवाडी, ता. इंदापूर), बाळू सोनबा वाघमोडे (रा. हनुमंतवाडी, ता. बारामती), बाबा महेश गायकवाड (रा. चिखली, ता. इंदापूर), अक्षय बापू मोहिते (रा. शेळगाव, ता. इंदापूर), धूळा पांडुरंग शेंडगे (रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर),बाळासाहेब राजाराम पवार (रा. इंदापूर रोड, बारामती), नितीन बबन पवार (रा. विद्यानगर माळेगाव, ता. बारामती), सोहेल शेख (रा. वालचंदनगर, ता. इंदापूर, जि. पुणे), ओंकार हनुमंत शिंदे (रा. तांदूळवाडी, ता.बारामती), सोहम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांचा समावेश आहे.

वरील आरोपींनी संगनमत करून पुण्याच्या लिक्विलोन फायनान्स कंपनीद्वारे बारामती चंदुकाका सराफ यांच्याकडे सोने कर्ज प्रकरणासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये बॅंक स्टेटमेंट, इन्कमटॅक्स रिटर्न फाइल, पॅन कार्ड, आधारकार्ड, पगार स्लीप बोगस असल्याचे चंदुकाका सराफ दुकानातील मॅनेजर शुक्लेश्वर जगताप यांच्या निदर्शनास आले. विशेषतः याच बोगस कागदपत्रांच्या आधारे याआगोदर संबंधितांना ७ मंजूर कर्ज प्रकरणाच्या आधारे ४५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने नेले आहेत. या प्राप्त स्थितीची खोलवर माहिती घेतली असता बारामतीचे चंदुकाका सराफ व पुण्याच्या लिक्विलोन फायनान्स कंपनीची वरील आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. पुढील तपास सहाय्यक फौजदार खरात करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00654 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top