बारामतीत फुलणार कृषी ज्ञानाची ‘चैत्रपालवी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत फुलणार कृषी ज्ञानाची ‘चैत्रपालवी’
बारामतीत फुलणार कृषी ज्ञानाची ‘चैत्रपालवी’

बारामतीत फुलणार कृषी ज्ञानाची ‘चैत्रपालवी’

sakal_logo
By

माळेगाव, ता. २१ : कृषी ज्ञानाची पालवी फुटण्यासाठी यंदाही अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेने शेतकऱ्यांसाठी शारदानगर येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘चैत्रपालवी’ या कार्यशाळेचे आयोजन केले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे यांनी दिली.
कृषी क्षेत्रातील नवनवीन बाबी शेतकऱ्यांना अवगत होत असताना आत्मविश्वासाची आवश्यकता असते, ही गरज भरून काढण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था दरवर्षी ‘चैत्रपालवी’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करते. यंदाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्रपालवी कार्यशाळा होणार आहे. त्यानिमित्त कै. अप्पासाहेब पवार प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा आहे. या कार्यशाळेत सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या दूर करण्यासाठी जगभरामध्ये उपलब्ध असणारे तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले येणार आहे. त्यासाठी जगभरातून नामवंत शास्त्रज्ञ व विविध विषयातील तज्ज्ञ हे व्याख्याने, कृती प्रात्यक्षिके, शिवार फेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कार्यशाळेतील चर्चेचे विषय
- विषमुक्त शेती व शेतमाल निर्यात
- शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर
- अन्न प्रक्रिया व विपणन
- शेतकरी उत्पादक कंपन्या
- आधुनिक दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन
- मातीचे आरोग्य, पर्यायी पीक पद्धती व शासकीय योजना

नाव नोंदणीसाठी
शेतकरी बांधवांनी https://forms.gle/zHbqd9JMq7F9C5XA7 या लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी व आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच, अधिक माहितीसाठी ९४२२५१९९७१, २७५५७३२९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00673 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..