यापुढे इंधनाचे दर वाढवू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यापुढे इंधनाचे दर वाढवू नका
यापुढे इंधनाचे दर वाढवू नका

यापुढे इंधनाचे दर वाढवू नका

sakal_logo
By

माळेगाव, ता.२२ः ‘‘केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला ही गोष्ट खरी आहे, परंतु अधिकची इंधन दरवाढ करायची आणि पुन्हा जनतेचा आक्रोश विचारात घेत  इंधनाचे दर कमी करायचे, हे कितपत योग्य आहे? यापुढेतरी कमी झालेले दर  या ना त्या कारणाने वाढू नयेत, हीच जनतेची अपेक्षा आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा समाचार घेतला.

बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशभर इंधन दरवाढीबाबत जनतेमध्ये आक्रोश होता. त्यामुळेच केंद्राने पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला. वास्तविक केंद्राने मोठ्या प्रमाणात इंधन, गॅस दरवाढ केली होती आणि आता हेच दर कमी केले आहेत. दर कमी झाल्याचे समाधान आहे. परंतु यापुढे पुन्हा इंधनाची दरवाढ केंद्राने करू नये. महाराष्ट्र सरकारनेही गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्यासाठी अर्थसंकल्प सादर करताना साडेतेरा टक्के टॅक्स साडेदहा टक्क्याने कमी केला. त्यामुळे राज्य सरकारला १ हजार कोटींचा टॅक्स सोडून द्यावा लागला.  जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्याने केला आहे, असे पवार म्हणाले.

‘‘केंद्रातील निधी एखाद्या प्रकल्पाला मिळतो, त्यावेळेस संबंधित मंत्र्यांना निमंत्रण दिले तर वावगे काय आहे? शेवटी सर्वच ठिकाणी राजकारण आणून चालत नाही. हेही सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे,’’ अशा शब्दांत अजित पवार यांनी माळेगावच्या सायन्स सेंटरच्या उद्घाटनाबाबत खुलासा केला.

सोलापूरकरांना आवाहन

उजनीच्या पाण्यासंदर्भात सोलापूरकरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याबद्दल पवार म्हणाले,‘‘ उजनीच्या पाण्याचे वाटप पूर्वीच झालेले आहे. मंजूर झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांबरोबर इंदापूर तालुक्यातील काही गावांना पाणी मंजूर झालेले आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांनी इंदापूरची योजना मागे पडत होती. परंतु आता त्याला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे, ही वस्तुस्थिती सोलापूरकरांनी समजून घ्यावी.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00674 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top