निंबाळकर, जगताप यांच्या बैलगाडा प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निंबाळकर, जगताप यांच्या बैलगाडा प्रथम
निंबाळकर, जगताप यांच्या बैलगाडा प्रथम

निंबाळकर, जगताप यांच्या बैलगाडा प्रथम

sakal_logo
By

माळेगाव, ता. १ ः पणदरे (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजितदादा केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये बाबा निंबाळकर (सणसर) आणि भूषणभैया जगताप (पणदरे) यांचा बैलगाडा प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरला. येथील स्व. रमेशदादा जगताप मैदानावर पार पडलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये दोन लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस निंबाळकर व जगताप यांच्या बैलगाड्याला जाहीर होताच त्यांच्या समर्थांनी गुलालाची मुक्त उधळण केली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशीलकुमार जगताप, जयदीप तावरे, संदीप जगताप, सचिन जगताप यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या वरील स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. हा आनंदसोहळा पाहण्यासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड आदी तालुक्यातील बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे एक लाख रुपयांचे बक्षिस कु. शौर्या दैवत गोवेकर (लोणंद) यांच्या बैलगाड्याला मिळाले. तसेच तृतीय क्रमांकावर यशस्वी झालेल्या पिंट्या गुफ्रू (सोमेश्वरनगर) यांच्या बैलगाड्याला ७१ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. चतुर्थ क्रमांक मिळालेलेल्या श्रीनिवास विलास शिंदे यांच्या बैलगाड्याला ५१ हजार रुपये देण्यात आले, तर पाचवे बक्षिस ४१ हजार रुपयांचे गोटू भैय्या जगताप (वाणेवाडी) यांना मिळाले. विशेषतः वरील स्पर्धेत एकूण १२८ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उद्योजक रवींद्र काळे, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय येळे, माळेगावचे संचालक योगेश जगताप, संचालक स्वप्नील जगताप, रणजित तावरे, विलास जगताप या मान्यवरांच्या उपस्थितीत वरील स्पर्धेचे उद्घाटन झाले, तर बक्षिस वितरण बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष वामनराव जगताप, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष राहुल वाबळे, रोहित कोकरे, अप्पाजी कोकरे यांच्या हस्ते झाले.

बक्षिस जाहीर करणारे मानकरी...!
बैलागाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे दोन लाख रुपयांचे बक्षिस उद्योजक रवींद्र काळे यांच्यावतीने जाहीर करण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे १ लाख रुपयांचे बक्षिस बारामती माजी उपनगराध्यक्ष बिर्जुभैया मांढरे व सचिन जगताप यांनी दिले. तसेच करण दांगट आणि प्रशांत जगताप यांच्यावतीने ७१ हजार रुपयांचे बक्षिस तृतीय क्रमांकासाठी देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षिस संदीप जगताप, पाचव्या क्रमांकाचे ४१ हजार रुपयांचे बक्षिस अमरजित जगताप व शिवराज जाधवराव यांनी दिले. शीतल अप्पा लोखंडे यांनी २१ हजार रुपयांचे सहावे बक्षिस दिल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00688 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top