माळेगावात उद्या मृत्युंजय यज्ञदिन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात उद्या मृत्युंजय यज्ञदिन सोहळा
माळेगावात उद्या मृत्युंजय यज्ञदिन सोहळा

माळेगावात उद्या मृत्युंजय यज्ञदिन सोहळा

sakal_logo
By

माळेगाव, ता. ३० : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार घटनेला ३१ मे रोजी एकवर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.
यानिमित्त बुधवारी (ता.१ जून) काशीविश्वेश्वर मंदिरात मृत्युंजय यज्ञदिन सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी सकाळी महाअभिषेक घातला जाणार आहे.
सोहळ्यानिमित्त योग व प्रमाणायाम शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता कर्मचाऱ्यांना किराणा किटचे मोफत वाटप, देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तावरे यांच्या समर्थकांनी हा दिवस मृत्युंजय (मृत्युवर विजय मिळलेला दिवस) दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. या दिनाचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी गावातील अमरसिंह कॉलनी उद्यानात योग व प्राणायम शिबिर घेण्यात आले. नीलेश महाजन, उज्ज्वला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन, रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली, पोषक आहार विषयी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00689 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top