
बारामतीत २६० प्रकल्पांच्या मांडणीने वेधले लक्ष
माळेगाव, ता. १७ : शारदानगर (ता. बारामती) येथील कृषी विज्ञान केंद्रात उभारलेल्या सायन्स अँड इनोवेशन अॅक्टिविटी सेंटरच्या उद्घाटनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात २६० प्रकल्पांचा सहभाग नोंदविला.
यामध्ये पुणे, नागपूर, सातारा, अहमदनगर, धुळे, विदर्भ, मराठवाडा, नांदेड, गोंदिया या ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानुसार घेतलेल्या प्रकल्प स्पर्धेत इ. ५ वी ते ८ वीमध्ये छोट्या गटात रेहान महम्मद रफिक पठाण यांचा सोलर मोबाईल चार्जर लक्षवेधी ठरला. तसेच तनिष्का प्रसाद कुंभार याचा ऑटोमॅटिक व्हील चेअर कम बेड हाही प्रकल्प उपस्थितांच्या पसंतीस उतरला. गीता गणपत धनवडे हिने सेफ्टी व्हिसलचा प्रयोग सादर केला. या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी (मोठा गट) मधील मंथन शिवाजी मोहिते याने एअर कार्बन फिल्टरचा प्रकल्प सादर केला. प्रंशु संजय पेडगावकर याने क्यू आर कोड संबंधी वेगळेपण सादर केले. तसेच निखिल पोपट यादव याच्या थ्रीडी होलोग्राम प्रयोग बक्षीस पात्र ठरला. याही विद्यार्थ्यांना अनुक्रमे पहिले, द्वितीय आणि तृतीय बक्षिस देण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी दहा हजार रुपये,दुसऱ्या क्रमांकासाठी सात हजार तर तिसऱ्या क्रमांकासाठी पाच हजार रुपयांसह ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोप, सायन्स सेंटर मेंबरशीप कार्ड देण्यात आले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (बारामती) प्रमुख राजेंद्र पवार, अरविंद परांजपे आदी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पवार म्हणाले, ‘‘पुस्तकी ज्ञानाबरोबर यापुढे विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्तीला चालना दिली पाहिजे.’’ या प्रदर्शनाचे परीक्षण नंदकुमार कासार, मेहमूद मुलाणी, विभावरी दामले, शीला पठाण, डॉ. तानाजी गुजर, डॉ. नीता डांगे, डॉ. कोरडे यांनी केले. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन राजेंद्र पवार, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त सुनंदा पवार, सीइओ नीलेश नलावडे, समन्वयक तनपुरे, एच.आर. गार्गी, सायन्स सेंटरच्या प्रमुख हीना भाटिया आदींनी केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00709 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..