''बारामती कृषी''च्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''बारामती कृषी''च्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
''बारामती कृषी''च्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

''बारामती कृषी''च्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

sakal_logo
By

माळेगाव, ता. २ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबलटेनिस स्पर्धेत अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट संचलित बारामती कृषी महाविद्यालयाच्या मुला-मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे.

बारामती येथे पार पडलेल्या वरील स्पर्धांमध्ये बारामती कृषी महाविद्यालयाचे २० विद्यार्थी सहभागी झाले होते. बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पार्थ राऊत, राहुल आडागळे, पार्थ जाधव, तन्नय अगवाण, हिमांशु पदमे इत्यादींचा समावेश आहे. बॅडमिंटन रोप्यपदक मिळविलेल्या मुलींमध्ये प्रतीक्षा मोहिते, साक्षी घुले, राजलक्ष्मी राऊत, अपेक्षा हरगुडे, रुचीता दौंडकर इत्यादींचा समावेश आहे. टेबलटेनिस स्पर्धेत मुलींना कास्यंपदक मिळविले आहे. त्यामध्ये तेजस्विनी मारकड, सायली अकोटकर, प्रतिम अल्हाट, अपेक्षा हरगुडे, रुचिता दौंडकर यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याची नोंद आहे. विशेषतः या यशस्वी स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले. क्रीडा शिक्षक बाळू आदलिंगे व अक्षय तावरे यांनी वरील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टचे (बारामती) प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार, सीईओ निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, प्रा.एस.पी. गायकवाड, प्रा.जया तिवारी यांनी केले.
.....
01140

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00744 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..