बारामतीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली
बारामतीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली

बारामतीत महिलेच्या गळ्यातील चैन हिसकावली

sakal_logo
By

माळेगाव, ता. ५ ः बारामती येथे एका परप्रांतीय महिलेच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि बदाम एका अनोळखी इसमाने हिसका मारून पळवून नेल्याची घटना घडली. बारामती औद्योगिक परिसरातील संदीप कॉर्नर येथील संजीवनी आइस्क्रीमच्या गाड्यावर आइस्क्रीम घेण्यास संबंधित महिला गेली असता वरील चोरीचा प्रकार घडला.
याप्रकरणी आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात प्रतिमा बिभूती सेनापती (वय ४०, सध्या रा. बारामती, मूळ रा. ओडिसा) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संदीप कॉर्नर येथील आइस्क्रीम गाड्यावर गेल्यानंतर एक अनोळखी इसम तिथे आइस्क्रीम घेण्याच्या बहाणा आला. त्याच वेळी संबंधित चोरट्याने गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसका नेली. संबंधित अनोळखी व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00747 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..