माळेगावात सुरक्षेसाठी पोलिस दक्ष : आवचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात सुरक्षेसाठी पोलिस दक्ष : आवचर
माळेगावात सुरक्षेसाठी पोलिस दक्ष : आवचर

माळेगावात सुरक्षेसाठी पोलिस दक्ष : आवचर

sakal_logo
By

माळेगाव, ता. १८ : माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षित वातावरण निर्माण करायचे आहे. गावोगावी शांततेला बाधा आणणारे अवैध व्यवसायही पूर्णतः बंद करण्यासाठी पोलिस कार्यतत्पर राहणार आहेत, असे सांगत पोलिस निरीक्षक गणेश आवचर यांनी माळेगाववासियांना शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले.

नव्याने अस्तित्वात आलेल्या माळेगाव पोलिस ठाण्यात सध्या तीन अधिकारी आणि ३० पोलिस कर्मचारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेबाबत माळेगावात आयोजित केलेल्या विशेष बैठकीत आवचर बोलत होते. या वेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही अधिकारी आवचर यांनी उत्तरे दिली. या वेळी प्रा. अनिल धुमाळ, सतीश गावडे, विजय भोसले, प्रदीप जगदाळे, ग्राहक संरक्षण समितीचे प्रमोद जाधव, फौजदार तुषार भोर, देविदास साळवे आदी उपस्थित होते.

माळेगाव हे सर्वांगीण विकासाच्या बाबतीत पुढारलेले गाव आहे. या गावात विकासाची घौडदौड सुरू आहे. शारदानगर, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ आदी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शाळकरी मुलांची संख्या २५ हजारांपेक्षा अधिक आहे. याशिवाय माळेगाव साखर कारखान्यासह लघुउद्योगधंदेही मोठ्या प्रमाणात आहेत. अशा स्थितीत माळेगाव सुरक्षित ठेवण्यासाठी आमचा पोलिस सदैव दक्ष राहणार आहेत. जनतेनेही ठरवून दिलेल्या शिस्तीचे पालन करावे.
गणेश आवचर, पोलिस निरीक्षक, माळेगाव पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00760 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..