प्रतिमा कोरेची २० लाखांच्या पॅकेजला गवसणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिमा कोरेची २० लाखांच्या पॅकेजला गवसणी
प्रतिमा कोरेची २० लाखांच्या पॅकेजला गवसणी

प्रतिमा कोरेची २० लाखांच्या पॅकेजला गवसणी

sakal_logo
By

माळेगाव, ता. २१ : येथील (ता.बारामती) अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी विभागातील विद्यार्थिनी प्रतिमा कोरे हिला सेल्सफोर्स या कंपनीतर्फे २० लाखांचे पॅकेज देण्यात आले आहे. या निवडीची प्रक्रिया अँप्टीट्यूड टेस्ट, प्रोग्रॅमिंग टेस्ट व पर्सनल इंटरव्ह्यू या तीन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली होती, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली.
प्रतिमा कोरे हिला नोकरीमध्ये मिळालेले यश ही बाब महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबीनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत वेळोवेळी आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी तसेच पॅकेजमधील नवीन उच्चांक गाठण्यास मदत होत आहे, असे मत प्राचार्य मुकणे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, रवींद्र थोरात, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, सीमा जाधव, चैत्राली गावडे व संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी प्रतिमाचे अभिनंदन केले.


उत्कटतेने आणि कठोर परिश्रमाने अधिक गोष्टी करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो. तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात. तसेच सातत्याने अभ्यास व प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. माझ्या या यशामध्ये महाविद्यालयातील शिक्षकांचा व महाविद्यालय शैक्षणिक संस्कृतीचा सिंहाचा वाटा आहे.
- प्रतिमा कोरे

''प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करा''
कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्याचे स्वप्न पाहत असतो. ते साकार करत असताना विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाचे व वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राऊळ यांनी व्यक्त केले.


01168

Web Title: Todays Latest District Marathi News Mal22b00761 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..